|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वाफोली येथील विवाहितेची आत्महत्या

वाफोली येथील विवाहितेची आत्महत्या 

प्रतिनिधी/ बांदा

वाफोली-टेंबवाडी येथील सुप्रिया सीताराम मोरजकर (35) या विवाहितेने विहिरीत आत्महत्या केली. ती शनिवारी सायंकाळी सहा वाजता घरातून निघून गेली होती. सकाळी तिची शोधाशोध केली असता तिचा मृतदेह विलवडे मार्गावरील विहिरीत आढळला. याबाबतची खबर तिचे वडील हरिराम शंकर गवस यांनी बांदा पोलिसांत दिली. याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद बांदा पोलिसांत करण्यात आली आहे.

 सुप्रिया मोरजकर यांचा इन्सुली येथील सीताराम मोरजकर यांच्याशी विवाह झाला होता. मात्र, विवाहानंतर सहा महिन्यापासून ती आपल्या माहेरी राहत होती. शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ती घरात कोणालाही न सांगता निघून गेली. या बाबत घरातील मंडळींनी तिची शोधाशोध केली. मात्र, ती सापडली नव्हती. सकाळी अकराच्या सुमारास तिचा मृतदेह बांदा दाणोली मार्गावरील वाफोली-टेंबवाडी येथील विहिरीत आढळला. बांदा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत चितारी यांनी मृतदेहाचे विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. याबाबतचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप धुरी करत आहेत.