|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत वडखोलचे गोवर्धन प्रथम

जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत वडखोलचे गोवर्धन प्रथम 

प्रतिनिधी/ मालवण

घुमडे ग्रामस्थ मंडळ आणि उद्योजक दत्ता सामंत यांच्या विद्यमाने भजनसम्राट पंढरीनाथ घाडीगावकर यांच्या स्मरणार्थ देवी घुमडाई मंदिरात आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत गोवर्धन भजन मंडळ वडखोल (ता. वेंगुर्ले) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

या स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण समारंभ माजी खासदार नीलेश राणे यांच्या हस्ते झाला. यावेळी दत्ता सामंत, अशोक सावंत, बांधकाम सभापती संतोष साटविलकर, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, तालुकाध्यक्ष मंदार केणी, बाबा परब, कुडाळ तालुकाध्यक्ष दीपक नारकर, विकास कुडाळकर, बाबू बिरमोळे, प्रकाश पारकर, भालचंद्र केळुसकर, परीक्षक माधव गावकर, गजानन देसाई, गणेश गावडे, संतोष कानडे, महेंद्र चव्हाण, उदय परब, भास्कर गावडे, साक्षी सावंत, अश्विनी गावडे, शिल्पा खोत, राजेंद्र प्रभूदेसाई, सरपंच दिलीप बिरमोळे, उपसरपंच सुधीर वस्त, बाळा माने, भाऊ सामंत, प्रशांत बिरमोळे, उमेश बिरमोळे, बाळा कासवकर आदी उपस्थित होते. या निमित्ताने दत्ता सामंत यांच्यावतीने गावातील 4 ते 80 वर्षे वयोगटातील ग्रामस्थांचा भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

रामकृष्ण हरी भजन सेवा संघ, पाट पंचक्रोशी आणि मेजारेश्वर भजन मंडळ नागवे यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला. स्पर्धेत शिवरामेश्वर भजन मंडळ आचरा, नादब्रह्म भजन मंडळ, कसाल आणि रवळनाथ भजन मंडळ, पिंगुळी यांनी उत्तेजनार्थ प्रथम तीन क्रमांक प्राप्त केले. वैयक्तिक पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट गायक-रुपेंद्र परब (गोवर्धन वेंगुर्ले), कोरस-रामकृष्ण हरी पाट, पखवाज वादक-रुपेश परब (नादब्रह्म कसाल), झांजवादक-शेखर परब (रामकृष्ण पाट), शिस्तबद्ध संघ-गोवर्धन मंडळ वडखोल. स्पर्धेचे परीक्षण माधव गावकर आणि गजानन देसाई यांनी केले.

राणे यांनी भजन स्पर्धा आयोजनाच्या उपक्रमाचे कौतुक केले. समाजाला दिशा देण्यासाठी भजन स्पर्धेसारखे उपक्रम आवश्यक आहेत. या ठिकाणच्या भजन स्पर्धेचे निश्चितच वेगळेपण आहे, असे सांगितले. सूत्रसंचालन राजा सामंत यांनी केले. तर बाबू बिरमोळे यांनी आभार मानले. 

 

Related posts: