|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सडये-शिवोली येथे जुगारावर धाड

सडये-शिवोली येथे जुगारावर धाड 

प्रतिनिधी/ पणजी

पोलीस अधीक्षक चंदन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी शिवोली-सडये येथे साखळेश्वर मंदिराजवळ मिनी बार येथे छापा घालून जुगार खेळणाऱया 10 जणांना ताब्यात घेऊन त्यांना अटक केले. यावेळी त्यांच्याजवळ 8 हजार रुपये रोख व अन्य साहित्य सापडले. ही कारवाई रात्री 9.30 वाजण्याच्या दरम्यान केली. रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरू होती. दरम्यान हणजूण व शिवोली दांडा व म्हापसा पालिका इमारतीच्या मागे चालणाऱया पत्त्याच्या जुगारावर छापा घालण्याच्या बेतात पोलीस गेले होते. मात्र त्यांना याबाबतचा सुगावा लागल्याने त्यांनी हा धंदा त्वरित बंद केला.

पोलिसांनी या प्रकरणी यती महेंद्र गोलतेकर (35), सनी अर्जुन दाभोळकर (36), हर्ष अंकुशा पेडणेकर (59), अनिल मधुकर वेर्णेकर (44), संदीप लाडू पेडणेकर, हनुमन मर्तो कळंगुटकर (34), प्रदेश कृष्णा हळदणकर (41), उमाकांत रमेश साळगावकर (34). हे सर्वजण सडये-शिवोली येथील नागरिक आहेत. या सर्वांना उशिरा जामिनावर सोडण्यात आले.

उपनिरीक्षक योगेश गडकर यांनी ही कारवाई केली. दरम्यान, बार्देश तालुक्यात चालणाऱया सर्व जुगाऱयांवर कारवाई करण्याची मागणी शिवोलीतील नागरिकांनी केली आहे.