|Thursday, November 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शौर्याची गाथा सांगणारे साक्षीदार बेळगावात

शौर्याची गाथा सांगणारे साक्षीदार बेळगावात 

प्रतिनिधी/ बेळगाव

भारतीय सेनेच्या युद्धाच्या इतिहासाचे साक्षीदार असणारे भव्य रणगाडे आता येथील मराठा लाईट इन्फंट्री केंद्रात दाखल झाले आहेत. रविवारी सायंकाळी या रणगाडय़ांची स्थापना केंद्रामध्ये करण्यात आली. या रणगाडय़ांच्या आगमनामुळे मराठा लाईट इन्फंट्री केंदाच्या वैभवात भर पडली आहे.

यापूर्वी झालेल्या युद्धांमध्ये वापर करण्यात आलेले हे रणगाडे यापूर्वी पुणे येथे होते. तेथून बेळगावातील मराठा लाईट इन्फंट्री केंद्रात त्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या केंद्रातील भव्यदिव्य अशा सुसज्ज संग्रहालयाने यापूर्वीपासून आपले वैभव जपले आहे. तसेच शौर्याचा इतिहास सांगणाऱया अनेक पाऊलखुणांची जपणूक येथे करण्यात आली आहे.

रविवारी या रणगाडय़ांचे आगमन झाले. त्यावेळी केंद्राचे कमांडंट ब्रिगेडीयर गोविंद कलवाड आणि त्यांच्या सहकारी वर्गाने त्यांचे स्वागत केले. यावेळी रणगाडय़ांची स्थापना करून याबाबत माहिती देण्यात आली.

आय. एन. पठाण यांची आगळी देशसेवा

महाकाय आकाराचे हे रणगाडे भव्य ट्रक ट्रॉलीवरून उतरवून त्यांची योग्य ठिकाणी स्थापना करण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला. सदर पेनची सुविधा पठाण गॅरेजचे संचालक आय. एन. पठाण यांनी उपलब्ध करून दिली. विशेष म्हणजे सदर कामगिरीसाठी दीड ते दोन लाखापर्यंतच्या निवीदा मागविण्यात आल्या होत्या. परंतु आय. एन. पठाण यांनी ही देशसेवेची संधी आहे, म्हणून आपण विनामूल्य कामगिरी करणार असल्याचे सांगितले. तसेच ही कामगिरी पूर्ण करून देशसेवेमध्ये खारिचा वाटा उचलून आदर्श ठेवला. त्यामुळे त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.

Related posts: