|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सीआयडीचे पथक बेंगळूरला परतले

सीआयडीचे पथक बेंगळूरला परतले 

संगोळ्ळी रायण्णा सोसायटी कार्यालयाची पाहणी

प्रतिनिधी/ बेळगाव

येथील संगोळ्ळी रायण्णा को-ऑप सोसायटीच्या माध्यमातून झालेल्या फसवणूक प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार दिवसांपूर्वी बेळगावला आलेले सीआयडीचे पथक रविवारी बेंगळूरला परतले. अधिकाऱयांनी रिसालदार गल्ली येथील सोसायटीच्या कार्यालयाची पाहणी केली आहे.

सीआयडीचे पोलीस उपअधिक्षक पुरुषोत्तम यांच्या नेतृत्वाखालील एक पथक गेल्या चार दिवसांपासून बेळगावात तळ ठोकून होते. संचालक व गुंतवणूकदारांना बोलावून त्यांची जबानी घेण्यात आली. आनंद अप्पुगोळ यालाही नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. मात्र सीआयडीच्या बेंगळूर येथे कार्यालयात हजर होण्याचे त्याने अधिकाऱयांना सांगितले आहे.

276 कोटी रुपयांच्या या फसवणूक प्रकरणाच्या चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱयांनी रिसालदार गल्ली येथील मुख्य कार्यालयासह शहरातील काही शाखांना भेटी देवुन पाहणी केली आहे. पुढच्या आठवडय़ात या पथकातील अधिकारी पुन्हा बेळगावला येणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे. गुरुवारपासून सीआयडीच्या अधिकाऱयांनी सीसीबीच्या कार्यालयात ठाण मांडून  होते.

Related posts: