|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » केरळ, कोडगु विस्थापितांना मदत करा

केरळ, कोडगु विस्थापितांना मदत करा 

प्रतिनिधी/ बेळगाव

अतिवृष्टीमुळे देवभूमी केरळ व कोडगु जिह्यात वाताहत झाली आहे. अनेक कुटुंबे उघडय़ावर पडली आहेत. त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करणे आपल्या साऱयांचे कर्तव्य असून गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱयांनी फटाक्मयांवर खर्च करण्यात येणारा पैसा विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी देवून माणुसकी जपावी, असे आवाहन एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमीर्ची यांनी केले.

रविवारी सायंकाळी एपीएमसी पोलीस स्थानकात शांतता समितीची बैठक झाली. गणेशोत्सव व मोहरमच्या पार्श्वभूमिवर झालेल्या या बैठकीत 50 हून अधिक गणेश मंडळांचे कार्यकर्ते व अनेक जमातचे सदस्य उपस्थित होते. मार्केटचे एसीपी शंकर मारिहाळ, पोलीस निरीक्षक विजय मुरगुंडी यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.

गणेशोत्सव व मोहरम एकाचवेळी आले आहेत. श्रींची प्रति÷ापना झाल्यानंतर लगेच राष्ट्रपतींचा बेळगाव दौरा होणार आहे. त्यामुळे प्रत्येक बेळगावकरांची जबाबदारी वाढली आहे. या काळात वीज तारांपासून कार्यकर्त्यांनी स्वतःला जपावे. पाच वर्षांपूर्वी 19 सप्टेंबर 2013 रोजी श्री विसर्जन मिरवणुकीत मोठी दुर्घटना घडली. सदाशिवनगर येथे विजतारेच्या स्पर्शाने चौघा जणांचा मृत्यू झाला. चार दिवसांपूर्वीच रुक्मिणीनगर येथेही मंडप घालताना वीजेचा धक्का बसून एक तरुण दगावला.

अशा घटना टाळण्यासाठी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी खबरादारी घेण्याचे आवाहन पोलीस अधिकाऱयांनी केले. फटाक्मयांवर मोठा खर्च केला जातो. फटाक्मयांवरील खर्च कमी करुन अतिवृष्टीमुळे विस्थापित झालेल्यांचे संसार पुन्हा उभारण्यासाठी हातभार लावावेत, असे आवाहन पोलीस अधिकाऱयांनी केले. याबरोबरच गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना महत्वाच्या सुचनाही यावेळी करण्यात आल्या.