|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वायव्य परिवहनची बससेवा सुरू राहणार

वायव्य परिवहनची बससेवा सुरू राहणार 

पोलिसांकडे संरक्षणाची मागणी, धोका नसलेल्या ठिकाणीच बससेवा सुरू राहणार

प्रतिनिधी / बेळगाव

इंधन दरवाढीच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदमध्ये परिवहन कर्मचारी वर्गानेही सहभाग घेण्याची घोषणा केली आहे. मात्र, परिवहन संस्थांनी बंदमध्ये सहभागाची अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाची बससेवा सोमवारी सुरू राहणार आहे. धोका नसलेल्या ठिकाणी अंदाज घेऊन बसेस सोडल्या जाणार आहेत.

वायव्य परिवहनचे बेळगाव विभागीय नियंत्रणाधिकारी एम. आर. मुंजी यांच्याशी संपर्क साधला असता हुबळी येथील मुख्यालयाने बंदमध्ये सहभागासंदर्भात कोणतेच आदेश दिलेले नाहीत. यामुळे बससेवा सुरू राहील. बसेस जाणाऱया मार्गांवरील संबंधित पोलीस स्थानकांना संरक्षण पुरविण्याची मागणी करण्यात आली आहे. बंदसाठी निदर्शने व आंदोलने झाल्यास तसेच धोका असल्यास बससेवा खंडित केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर प्रवास करावा की नाही, याचा निर्णय आता प्रवाशांनाच घ्यावा लागणार आहे.   

 

Related posts: