|Sunday, June 16, 2019
You are here: Home » leadingnews » भारत बंद : देशभरातून बंदला प्रतिसाद ; अनेक ठिकाणी तोडफोड

भारत बंद : देशभरातून बंदला प्रतिसाद ; अनेक ठिकाणी तोडफोड 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसकडून ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. या आंदोलनाला डावे पक्ष, मनसे व द्रमुकसह देशातल्या 21 राजकीय पक्षांनी या ‘काँग्रेसच्या बंद’ ला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मुंबई शहरासह अनेक ठिकाणी आंदोलनाला समिश्र प्रतिसाद मिळत आहे, तर काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याचे दिसत आहे.

पुण्यात भारत बंदला हिंसक वळण लागले आहे. या बंद दरम्यान कोथरुड डेपोमध्ये पीएमपी बस पेटवून देण्याची घटना पहाटे घडल्याची माहिती मिळत आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांकडून याबाबतचे व्हिडीओ तातडीने व्हायरल केल्याने बंद पार्श्वभूमीवर ही बस पेटली नसून पेटविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान कुमठेकर रोडवर मनसे कार्यकर्त्यांनी सकाळी सात वाजता एका पीएमपी बसवर दगडफेक करुन तिच्या काचा फोडल्याचे समोर आले आहे. चेंबूरमधील वाशी नाका परिसरात काही कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान बेस्टच्या बसवर दगडफेक केल्याची घटना घडली. तसेच, प्रतिक्षानगर बस डेपोमध्ये सुद्धा काही बसची तोडफोड करण्यात आल्याचे समजते आहे. दरम्यान, या घटनेत बसच्या काचा फुटल्या असून कोणतीही जिवितहाणी झाली नसल्याचे समजते. याशिवाय, चेंबूरमध्ये आंदोलन करणाऱया आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर, चेंबूर नाका येथे डायमंड पेट्रोल पंपावर मनसेने अनोखे आंदोलन केले. यावेळी मनसेने पेट्रोलपंपावर गाढव आणले आणि आंदोलन केले. दुसरीकडे, अंधेरी स्टेशनवर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

 

 

 • हैदराबादमध्ये डाव्यांचे आंदोलन

  हैदराबादमध्ये डाव्यांचे आंदोलन

 • कोल्हापुरात काँग्रेस आणि डाव्यांचे आंदोलन

 • पटना : पटना मध्ये आंदोलकांनी गाड्यांची तोडफोड केली.
 • पटना : भारत बंद चा परिणाम पटनामध्ये हि दिसून आला. पटनामध्ये आंदोलकांनी रेल्वे थांबवल्याने प्रवाश्यांचे हाल होत आहेत.
 • मुंबई – गोरेगावात मनसे कार्यकर्त्यांनी बसची हवा सोडली.
 • ठाणे – मनसे आणि काँग्रेसकडून रिक्षावाल्यांना हात जोडून बंदचं आवाहन, रिक्षा बंद न करणाऱ्यांवर जबरदस्ती.
 • मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विक्रोळी बस डेपो बंद पाडला.
 • नाशिक –  शहरातील अनेक पेट्रोल पंप बंद, त्र्यंबकनाका परिसरातील तीनही पेट्रोल पंप बंद असल्याने वाहनचालकांचे हाल.
 • मुंबई  – मनसे कार्यकर्त्यांनी काही काळ मेट्रो रोखली, डी एन नगर स्टेशनजवळ मेट्रो बंद करण्याचा प्रयत्न, काही काळ  अडवल्यानंतर मेट्रो पुन्हा सुरु.
 • पुण्यात मनसे कार्यकर्त्यांकडून पीएमटी बसेसची तोडफोड
 • विरारमध्ये मनसे कार्यकर्ते रस्त्यावर, मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
 • ओडिशामध्ये काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, रेल्वे रोखली
 • तेलंगणा: काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर, बस डेपोसमोर बसून आंदोलन