|Saturday, November 17, 2018
You are here: Home » Top News » राहुल गांधींकडून कैलास यात्रेवरून आणलेले पाणी गांधीजींच्या समाधीवर आर्पण

राहुल गांधींकडून कैलास यात्रेवरून आणलेले पाणी गांधीजींच्या समाधीवर आर्पण 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने भारत बंद ची हाक दिली आहे. या बंदला राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेससह मनसेनेही पाठिंबा दिला आहे. तर देशभरातील अनेक प्रादेशिक पक्षांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला गल्लीपासून दिल्लीपर्यंत आता सुरुवात होताना दिसत आहे.

तर दुसरीकडे कैलाश-मानसरोवर यात्रेहून परतलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षांनी कैलास -मानसरोवर यात्रेवरुन आणलेल्या पाण्याची बाटली खिशातून काढली आणि त्यातले पाणी महात्मा गांधींच्या समाधीवर अर्पण केले. यावेळची दृश्य कॅमेऱयात कैद झाली आहेत. त्यामुळे राहुल गांधींनी एकाच वेळी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन लोकभावनेला हात घातला. तर दुसरीकडे कैलाश मानसरोवरहून आणलेले पाणी वाहून धार्मिक भावनाही जिंकण्याचा प्रयत्न केला. दर्शन घेतल्यानंतर राजघाटवरुन पदयात्रा करत रामलीला मैदानावर जाणार आहेत आणि तिथे धरणे आंदोलनाला सुरुवात होईल. विशेष म्हणजे आजच्या आंदोलनात सोनिया गांधी स्वतः उपस्थित राहणार आहेत.

Related posts: