|Sunday, November 18, 2018
You are here: Home » Top News » भारत बंद : आता सरकार बदलण्याची वेळ आली आहे : मनमोहन सिंग

भारत बंद : आता सरकार बदलण्याची वेळ आली आहे : मनमोहन सिंग 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेससह 25 राजकीय पक्षांनी आज ‘भारत बंद’ पुकारला आहे. या आंदोलनाला मुंबई शहरासह अनेक ठिकाणी समिश्र प्रतिसाद मिळत आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी दादरमध्ये शिवसेना भवन परिसरात ‘अच्छे दिन’ची अंत्ययात्रा काढली. मात्र शिवसेनेनं या बंदला पाठिंबा दर्शवलेला नाही. राजधानी नवी दिल्लीमधील रामलीला मैदानावर काँग्रेससह विरोधी पक्षनेते एकवटले आहेत. सत्ताधारी भाजपाविरोधात जोरदार निदर्शने सुरू आहेत. यावेळेस माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला.

‘देशहितार्थ नसलेल्या अनेक गोष्टी मोदी सरकारने केल्या आहेत. मोदी सरकार सर्वच बाबतींमध्ये अपयशी ठरले आहे, त्यामुळे आता सरकार बदलण्याची वेळ आली आहे’, असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. दुसरीकडे, चेंबूरमधील वाशी नाका परिसरात काही कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान बेस्टच्या बसवर दगडफेक केल्याची घटना घडली. प्रतिक्षानगर बस डेपोमध्ये सुद्धा काही बसची तोडफोड करण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या घटनेत बसच्या काचा फुटल्या असून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. याशिवाय, चेंबूरमध्ये आंदोलन करणाऱया आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर, चेंबूर नाका येथे डायमंड पेट्रोल पंपावर मनसेने अनोखे आंदोलन केले. यावेळी मनसेने पेट्रोलपंपावर गाढव आणले आणि आंदोलन केले.

Related posts: