|Monday, November 19, 2018
You are here: Home » Top News » जनक्षोभ उसळेल इतकेही इंधर दर नकोत : सुब्रमण्याम स्वामी

जनक्षोभ उसळेल इतकेही इंधर दर नकोत : सुब्रमण्याम स्वामी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ विरोधी पक्षांकडून ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली आहे. या बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. संपूर्ण देशभरात या बंदचा परिणाम दिसू लागल्यानंतर भाजपाचे नेते आणि केंद्रीय कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारची बाजू मांडली. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे इंधनाचे दर वाढले आहेत. त्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर कमी करणे आमच्या हातात नाही, असे म्हणत रवीशंकर प्रसाद यांनी हात वर केले.

 

भाजपा कायम देशातील जनतेसोबत आहेत. देशातील जनतेला होत असलेल्या त्रासाची आम्हाला कल्पना आहे. मात्र इंधनाचे दर आमच्या हातात नाही, असं म्हणत रवीशंकर प्रसाद यांनी पेट्रोल, डिझेलचे दर कमी करण्याबद्दल असमर्थतता दर्शवली. ’प्रत्येकाला विरोध करण्याचा अधिकार आहे. मात्र आज देशात काय सुरू आहे? पेट्रोल पंपांवर तोडफोड सुरू आहे. बसेस जाळल्या जात आहेत. त्यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे,’ असं म्हणत प्रसाद यांनी बंद दरम्यान सुरू असलेल्या हिंसक घटनांवर भाष्य केले.

 

Related posts: