|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » Top News » संगणक क्षेत्रातील ‘आयॅश्युअर’ राष्ट्रीय स्तरावर अव्वल ‘सीआयओ रिव्हियू इंडिया’तर्फे सर्वेक्षण

संगणक क्षेत्रातील ‘आयॅश्युअर’ राष्ट्रीय स्तरावर अव्वल ‘सीआयओ रिव्हियू इंडिया’तर्फे सर्वेक्षण 

ऑनलाईन् टीम / पुणे :

पुण्यातील आयॅश्युअर इंटरनॅशनल टेकनॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला यंदा ‘राष्ट्रीय स्तरावरील संगणक क्षेत्रातील सर्वात आशादायक कंपनी ठरली आहे. राष्ट्रीय स्तरावरील टॉप-10 मध्ये या कंपनीने अग्रणी स्थान पटकावले आहे. जागतिक स्तरावरील नामांकित आणि संगणक क्षेत्राशी निगडित मासिक ‘सीआयओ रिव्हियू इंडिया’ने हे सर्वेक्षण केले आहे. 1200 स्टार्टअप आणि छोटय़ा कंपन्यांसाठी हे सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती कंपनीचे संस्थापक आणि मॅनेजिंग डायरेक्टर आशिष नाईक यांनी दिली.

मोबाईल आणि वेब ऍप डेव्हलप करणारी आयॅश्युअर इंटरनॅशनल टेकनॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी 2015 मध्ये स्थापन झाली. अत्यंत प्रगत आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापरामुळे ग्राहकांचे, पारंपरिक तंत्रज्ञानाच्या तुलनेत 40 टक्के बचत होत असल्याचे नाईक यांनी सांगितले. याव्यतिरिक्त कंपनीचे आंतरराष्ट्रीय पेटंट जे जगातील ऊर्जा आणि वीज निर्मिती क्षेत्रातील सर्वात मोठे तांत्रिक पोर्टलबद्दल आहे. त्यामध्ये खूप क्लिष्ट आणि अद्ययावत तंत्रज्ञान वापरले आहे.