|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » Top News » ‘मिलेक्स 2018’ या संयुक्त लष्करी सारवाचे उद्घाटन

‘मिलेक्स 2018’ या संयुक्त लष्करी सारवाचे उद्घाटन 

पुणे / प्रतिनिधी  :

दहशतवादाचा धोका भारतासह शेजारील देशांना देखील आहे. दहशतवादाला आळा घालण्यासाठी युद्ध कौशल्य आत्मसात करणे आणि आपापसात समन्वय निर्माण करणे हा ‘बिमस्टेक मिलेक्स’ या संयुक्त लष्करी सरावाचे उद्देश अs मत 11 इन्फैंट्री डीव्हिजनचे प्रमुख संजय शर्मा यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.

पुण्यात सोमवार पासून सूरु झालेल्या बिमस्टेक देशांच्या मिलेक्स 2018 या संयुक्त लष्करी सारवाच उद्घाटन शर्मा यांच्या उपस्थितीत झाले त्यावेळी ते बोलत होते. हा सराव 16 सप्टेंबरपर्यंत चालणार असून यामधे भारत, श्रीलंका, भुटान म्यानमार, बांग्लादेश, या देशांच्या लष्कराच्या तुकडय़ा सहभागी झाल्या आहेत. तर नेपाळ आणि थायलंडचे निरीक्षक यावेळी उपस्थित राहणार आहेत. याच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी लष्कराचे संचलन यावेळी झाले. तसेच हेलिकॉप्टरनी देखील सलामी देण्यात आली.