|Saturday, November 17, 2018
You are here: Home » Top News » पुणे फेस्टिव्हलमध्ये कार्यक्रमांची मेजवानी

पुणे फेस्टिव्हलमध्ये कार्यक्रमांची मेजवानी 

पुणे / प्रतिनिधी

कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, क्रीडा यांचा मनोहारी संगम असणाऱया पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन येत्या 14 तारखेला अभिनेत्री हेमामालिनी यांच्या हस्ते सायंकाळी 4.30 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणार असून, या महोत्सवात रसिकांना विविध कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. फेस्टिव्हलचे संयोजक सुरेश कलमाडी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पालकमंत्री गिरीष बापट व राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, पुण्याचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सुहास दिवसे आदी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. महोत्सवाची सुरुवात ज्येष्ठ सनईवादक तुकाराम दैठणकर यांच्या सनईवादनाने होणार आहे.

प्रख्यात कथ्थक नृत्यांगना ऋजुता सोमण व भरतनाटय़म् नृत्यांगना अरुंधती पटवर्धन सहकलावंतांसमवेत गणेशवंदना सादर करतील. यानंतर महाराष्ट्र मंडळाची 15 मुले व मुली आकर्षक योग प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. ज्ये÷ कवी ग. दि. माडगूळकर, ज्ये÷ गायक व संगीतकार सुधीर फडके आणि साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या गाण्यांचे प्रातिनिधिक सादरीकरण करणारा ‘स्वरांजली’ हा कार्यक्रम होईल. स्त्री शक्तीचा जागर असणारे ‘पोवाडा फ्युजन’ हे उद्घाटन सोहळय़ाचे आकर्षण असेल. रात्री 8.30 वाजता सुफी संगीत दरबार (कव्वाली) हा बहारदार कार्यक्रम होईल. श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पुणे फेस्टिव्हलचे अन्य मुख्य कार्यक्रम होणार असून त्यामध्ये ‘मिस पुणे फेस्टिव्हल’ स्पर्धा, जितेंद्र भुरूक यांचा ‘गोल्डन इरा ऑफ म्युझिक’, हिंदी हास्य कविसंमेलन, गायिका राणी वर्मा यांच्या ‘जश्न-ए-हुस्न’ या कार्यक्रमाचा समावेश आहे. तर अन्य सांस्कृतिक कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर व यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे होतील. यात ‘शिवतांडव’, ‘सुरवंदना’सह ‘देवी पार्वती’ हा कथ्थक नृत्याविष्कार होईल. याशिवाय ‘अर्ध नारेश्वर’ हा कथ्थक बॅले, ‘हास्योत्सव एकपात्रींचा’ व विविध कार्यक्रम होतील.

Related posts: