|Monday, July 22, 2019
You are here: Home » Top News » शिवसेना केसाळ कुत्र्यासारखी : राज ठाकरे

शिवसेना केसाळ कुत्र्यासारखी : राज ठाकरे 

ऑनलाईन टीम / मुंबई

शिवसेना केसाळ कुत्र्यासारखी आहे. कुठून बघायचे हेच समजतच नाही. शिवसेनेला स्वतः ची भूमिका राहिली नाही, अशी जळजळीत टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर केली. तसेच, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला.

शिवसेनेने ‘भारत बंद’वर टीका केली. त्यावरील प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरेंनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, ‘शिवसेना केसाळ कुत्र्यासारखी आहे. कुठून पहायचे हेच कळत नाही. शिवसेनेला स्वतः ची भूमिका राहिली नाही.’ तसेच, राज ठाकरे पुढे म्हणाले, ‘शिवसेनेला स्वतःची भूमिका राहिली नाही. ह्यांची पैश्याची कामे अडली की हे सत्तेतून बाहेर पडायची धमकी देतात आणि कामे झाली की सत्तेत राहतात.’ ‘महाराष्ट्र सैनिकांनी आज उत्तम आंदोलने केली. मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे अभिनंदन करतो. त्यांनी सतत असा जागता पहारा ठेवला पाहिजे.’, असे म्हणत राज ठाकरेंनी ‘भारत बंद’मध्ये सहभागी मनसैनिकांचे अभिनंदन केले. ‘आज महाराष्ट्र सैनिकांवर ज्या पद्धतीची कलमे टाकली गेली, ती पाहून मला भारतीय जनता पक्षाला सांगावसे वाटते की, आज तुम्ही सत्तेत आहात, उद्या तुम्ही विरोधात असाल. याचा आम्ही समाचार घेऊच, पण भाजपच्या अंगलट हे येणार नक्की’, असा इशारा राज ठाकरेंनी भाजपला दिला.