|Thursday, July 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » हिंदू शब्दाला अस्पृश्य ठरविण्याचा कट : उपराष्ट्रपती

हिंदू शब्दाला अस्पृश्य ठरविण्याचा कट : उपराष्ट्रपती 

वृत्तसंस्था/ शिकागो

काही लोक हिंदू शब्दाला अस्पृश्य स्वरुप देण्याचा प्रयत्न करत आहेत. जगासमोर अत्यंत प्रामाणिक गोष्टी समोर याव्यात, याकरता व्यक्तीला विचारांच्या योग्य दृष्टीकोनातून पाहत मांडले जावे असे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी शिकागो येथील विश्व हिंदू परिषदेला संबोधित करताना म्हटले आहे. स्वामी विवेकानंद यांनी 11 सप्टेंबर 1893 रोजी केलेल्या ऐतिहासिक भाषणाला 125 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

भारत सार्वभौमिक सहनशीलतेवर विश्वास ठेवतो तसेच सर्व धर्मांचा सन्मान करतो. हिंदू धर्माची खरी मूल्ये वाचविण्याची गरज आहे. खोटय़ा माहितीवर आधारित विचार बदलण्यासाठी हे आवश्यक असल्याचे उद्गार उपराष्ट्रपती नायडू यांनी काढले आहेत.

हिंदू एकत्र आल्यास प्रगती निश्चित

हिंदू एकजूट होणे अवघड आहे. हजारो वर्षांपासून शोषित राहिलेले हिंदू स्वतःच्या सिद्धांतांचे पालन करणे आणि अध्यात्मिकता विसरून गेले आहेत. हिंदू समाज एकत्र आल्यास वेगाने प्रगती करू शकेल. कोणावरही हुकुमत गाजविण्याची हिंदूंची मानसिकता नाही. हिंदूंना विरोध करणारे काही लोक आहेत, त्यांनी नुकसान पोहोचवू नये याकरता आम्हाला सज्ज रहावे लागेल असे सरसंघचालक भागवत यांनी करताना म्हटले होते.