|Friday, April 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मुशर्रफ विरोधातील खटला गतिमान

मुशर्रफ विरोधातील खटला गतिमान 

इस्लामाबाद

 पाकिस्तानचे माजी हुकुमशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या विरोधातील देशद्रोहाच्या खटल्याची सुनावणी करणाऱया विशेष न्यायालयाने 9 ऑक्टोबरपासून प्रतिदिन सुनावणीचा निर्णय घेतला आहे. 2007 मध्ये आणीबाणी लागू केल्याने मुशर्रफ यांच्या विरोधात 2013 मध्ये देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. न्यायाधीश यावर अली यांच्या नेतृत्वाखालील 3 सदस्यीय खंडपीठाने सोमवारी याप्रकरणी सुनावणी घेतली. मुशर्रफ यांना कशाप्रकारे न्यायालयासमोर हजर केले जाऊ शकते, याची लेखी कार्ययोजना सादर करण्याचा आदेश न्यायालयाने गृह मंत्रालयाला दिला आहे.

 पाकिस्तानात परतण्याचे आश्वासन देत मुशर्रफ  2016 मध्ये दुबईला गेले होते. पाकिस्तानात परत येण्यास नकार दिल्याने विशेष न्यायालयाने त्यांना फरार गुन्हेगार घोषित करून त्यांची मालमत्ता जप्त करण्याचा निर्देश दिला आहे. सुरक्षेचा दाखला देत मुशर्रफ मायदेशात परतण्यास नकार देत आहेत.

Related posts: