|Monday, July 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पॅरिस शहरात चाकू हल्ला, 7 जखमी : हल्लेखोर अटकेत

पॅरिस शहरात चाकू हल्ला, 7 जखमी : हल्लेखोर अटकेत 

पॅरिस 

 फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये रविवारी रात्री एका अफगाण नागरिकाने चाकू आणि लोखंडी सळीने केलेल्या हल्ल्यात दोन ब्रिटेश पर्यटकांसमवेत 7 जण जखमी झाले आहेत. गंभीर जखमांमुळे यातील 4 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. पॅरिसच्या बासिन डे ला विलेट भागातील एका कालव्यानजीक ही घटना घडली. पोलिसांनी हल्लेखोराला अटक करत चौकशीस प्रारंभ केला असून या हल्ल्याला दहशतवादी घटना ठरविण्यास नकार दिला. हल्लेखोराने हातात लोखंडी सळी आणि 10 ते 11 इंच लांबीचा चाकू धरला होता. प्रसिद्ध पर्यटनस्थळ असणाऱया बासिन डे ला विलेट भागात त्याने अचानकपणे लोकांवर हल्ला करण्यास प्रारंभ केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.