|Monday, November 19, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पेन्शन योजनेला विरोध, रशियात 800 जण अटकेत

पेन्शन योजनेला विरोध, रशियात 800 जण अटकेत 

रशियात ब्लादिमीर पुतीन सरकारकडून प्रस्तावित निवृत्तीवेतन योजनेतील दुरुस्तीच्या विरोधात देशव्यापी निदर्शनांमध्ये भाग घेणाऱया 839 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रशियाच्या एका स्वतंत्र निरीक्षक गटाने ही माहिती दिली. देशात सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याच्या सरकारच्या प्रस्तावाच्या विरोधात हजारोंच्या संख्येत निदर्शक रस्त्यांवर उतरले आहेत. विरोधी पक्ष नेते ऍलेक्सी नावल्नी यांच्या समर्थकांकडून ही निदर्शने आयोजित करण्यात आली. रशियाचे दुसरे सर्वात मोठे शहर सेंट पीटस्बर्गमध्ये सर्वाधिक लोक ताब्यात घेण्यात आले आहेत. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीमारात एक पत्रकार जखमी झाल्याचे समजते. सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यास तरुणाईचा तीव्र विरोध आहे.तर आर्थिक संकटापायी पुतीन सरकारने हा निर्णय घेतल्याचे मानले जाते.

Related posts: