|Saturday, April 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मेहबुबा मुफ्तींचाही निवडणुकीवर बहिष्कार

मेहबुबा मुफ्तींचाही निवडणुकीवर बहिष्कार 

‘कलम 35 अ’साठी मरेपर्यंत लढण्याची तयारी

श्रीनगर :

जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सनंतर आता पीडीपीने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असल्याची घोषणा केली आहे. पीडीपीने भारतीय संविधानाच्या कलम 35-अ चा मुद्दा उपस्थित करत निवडणुकांमध्ये सहभागी होणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी सोमवारी पीडीपी पदाधिकाऱयांच्या विशेष बैठकी दरम्यान ‘कलम 35 अ’ला कायम पाठींबा देत बहिष्काराची घोषणा केली.  शेवटच्या श्वासापर्यंत जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा मिळण्यासाठी लढत राहणार असल्याचेही मेहबुबा यांनी स्पष्ट केले. कलम 35 अ नुसार मिळालेला हक्क राज्यातील प्रत्येक व्यक्तींच्या जीवनावर आधारीत आहे. केंद्र या विषयावर आपले मत स्पष्ट करत नाही तोपर्यंत पीडीपी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकेल. जम्मू-काश्मीरमध्ये सध्या निर्माण झालेली भिती आणि अनिश्चिततेच्या परिस्थितीत निवडणुका लढविणे चुकीचे होईल असे मत मेहबुबा मुफ्ती यांनी स्पष्ट केले आहे.

फारुख यांची याअगोदर बहिष्काराची घोषणा

मेहबुबा मुफ्तींच्या घोषणेपूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी 35 अ च्या मुद्यावरून पंचायत निवडणुकांवर बहिष्काराची घोषणा केली होती. जोपर्यंत केंद्र सरकार 35 अ विषयी राज्यातील लोकांच्या मनातील शंका दूर करून समाधान प्राप्त करून देत नाही तोपर्यंत नॅशनल कॉन्फरन्स पक्ष निवडणुकीत सहभागी होणार नाही, असे त्यांनी चार दिवसांपूर्वी जाहीर केले होते.

Related posts: