|Saturday, April 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सोनिया, राहुल गांधींना न्यायालयाचा झटका

सोनिया, राहुल गांधींना न्यायालयाचा झटका 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

कर निर्धारणाचे जुने दस्तावेज खुले केल्याप्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेणाऱया सोनिया आणि राहुल गांधी यांना सोमवारी झटका मिळाला. करासंबंधीची कागदपत्रे खुली करण्याचा अधिकार प्राप्तिकर विभागाला असून त्यासंबंधी न्यायालयात दाद मागण्याची आवश्यकता नाही, अशी स्पष्टोक्ती न्यायालयाने केली आहे. न्यायमूर्ती एस. रविंद्र भट आणि ए. के. चावला यांच्या खंडपीठाने हा निर्णय सोमवारी जाहीर केला.

प्राप्तिकर खात्याने तपासादरम्यान सोनिया आणि राहुल गांधी यांचे 2011-12 या वर्षातील काही कागदपत्र तपासले होते. त्याला अनुसरून सोनिया आणि राहुल गांध यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी प्राप्तिकर विभागाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. मात्र, पारदर्शक तपासासाठी जुने कोणतेही दस्तावेज प्राप्तिकर विभाग पडताळू शकते, अशी स्पष्टोक्ती देत उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. काँग्रेस नेते ऑस्कर फर्नांडीस यांचीही अशाच प्रकारची याचिका फेटाळून लावण्यात आली आहे.

Related posts: