|Monday, April 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » नीरवच्या बहिणीविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी

नीरवच्या बहिणीविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

पंजाब नॅशनल बँकेची 13 हजार कोटी रुपयांची फसवणूक करून विदेशात फरार झालेल्या नीरव मोदी याच्यापाठोपाठ आता त्याची बहीण पूर्वी हिच्याविरोधातही रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. मागील आठवडय़ातच नीरव मोदीचा निकटवर्तीय मिहीर भन्साळी याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. इंटरपोलकडून झालेल्या या कारवाईमुळे आता 192 सदस्य देशातील सुरक्षा यंत्रणा संबंधितांना कधीही अटक करू शकतात. नीरव मोदीसह तिच्या बहिणीचे वास्तव्य नेमके कोणत्या देशात आहे याबाबत निश्चित ठावठिकाणा अद्याप समजलेला नाही.

Related posts: