|Friday, January 18, 2019
You are here: Home » क्रिडा » भारताचा मालदिववर विजय

भारताचा मालदिववर विजय 

वृत्तसंस्था/ ढाक्का

रविवारी येथे झालेल्या सॅफ चषक फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात भारताने मालदिवचा 2-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. या सामन्यात भारतीय फुटबॉल संघाने दर्जेदार आणि आक्रमक खेळ करत मालदिवचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले.

या सामन्यात भारतीय संघातील निखिल पुजारीने 36 व्या मिनिटाला तर मनवीर सिंगने 45 व्या मिनिटाला गोल नोंदविले. पुजारी आणि मनवीर सिंग यांचे हे आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पहिले गोल ठरले. या विजयामुळे भारताने ब गटात सहा गुणांसह आघाडेचे स्थान मिळविले. बुधवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होईल. 2013 च्या सप्टेंबरमध्ये काठमांडू येथे झालेल्या सॅफ फुटबॉल स्पर्धेतील लढतीत भारताने पाकचा 1-0 असा पराभव केला होता. तब्बल पाच वर्षांनंतर भारत-पाक यांच्यात बुधवारी अधिकृत सामना खेळविला जाणार आहे.

Related posts: