|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » क्रिडा » वर्मा, रनकिरेड्डी-शेट्टी विजेते

वर्मा, रनकिरेड्डी-शेट्टी विजेते 

वृत्तसंस्था / हैदाबाद

रविवारी येथे झालेल्या 75 हजार डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या बीडब्ल्यूएफ टूर सुपर 100 हैद्राबाद खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या बॅडमिंटनपटूंनी पुरूष एकेरी आणि दुहेरीची अजिंक्यपदे मिळविली.

पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या टॉप सीडेड समीर वर्माने मलेशियाच्या व्हेनचा 21-15, 21-18 असा पराभव केला. पुरूष दुहेरीच्या अंतिम लढतीत भारताच्या सात्विकराज रनकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने इंडोनेशियाच्या कॅहेनो आणि इसाफेहानी यांचा 21-16, 21-14 असा पराभव करत विजेतेपद मिळविले. मिश्र दुहेरीत अग्रमानांकित भारताच्या प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी यांना पराभव स्वीकारावा लागल्याने भारताची जेतेपदाची हॅट्ट्रिक मात्र हुकली. अंतिम चोप्रा-सिक्की रेड्डी यांना मलेशियाच्या सहाव्या मानांकित अकबर बिनतांग काह्योsनो व विनी ओक्ताविना कांडो यांच्याकडून 15-21, 21-19, 25-23 असा पराभव स्वीकारावा लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.