|Monday, April 22, 2019
You are here: Home » क्रिडा » फ्रान्स, जर्मनी संघांचे विजय

फ्रान्स, जर्मनी संघांचे विजय 

वृत्तसंस्था/ पॅरिस

रविवारी येथे झालेल्या नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात फ्रान्सने बेल्जियमचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला. दुसऱया एका सामन्यात जर्मनीने पेरूवर 2-1 अशी मात केली.

फिफाच्या विश्व करंडक विजेत्या फ्रान्सने या सामन्यात दर्जेदार खेळ केला. विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविल्यानंतर फ्रान्स संघाचा मायदेशातील हा पहिला सामना असल्याने शौकिनांनी अधिक गर्दी केली होती. फ्रान्सतर्फे क्लियान मिबेपी आणि ऑलिव्हर गिरॉड यांनी प्रत्येकी 1 गोल केला तर हॉलंडतर्फे रेयान बॅबेलने गोल नोंदविला. फ्रान्स फुटबॉल संघाचा हा हॉलंडवरील सलग पाचवा विजय आहे.

रविवारी खेळविण्यात आलेल्या मित्रत्वाच्या फुटबॉल सामन्यात जर्मनीने पेरूचा 2-1 असा पराभव केला. या सामन्यात पेरूने 25 व्या मिनिटाला ऍडव्हिनक्यूलाच्या गोलवर आपले खाते उघडले. त्यानंतर म्हणजे 27 व्या मिनिटाला ज्युलियन ब्रँडेटने जर्मनीला बरोबरी साधून दिली. 85 व्या मिनिटाला बचाव फळीतील निको स्कूलेझने जर्मनीचा दुसरा आणि निर्णायक गोल नोंदविला. नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील यापूर्वी झालेल्या सामन्यात जर्मनीने विश्वकरंडक विजेत्या फ्रान्सला गोलशून्य बरोबरीत रोखले होते.

Related posts: