|Thursday, February 21, 2019
You are here: Home » क्रिडा » कूक सर्वाधिक धावा जमविणाऱयांत पाचव्या स्थानी

कूक सर्वाधिक धावा जमविणाऱयांत पाचव्या स्थानी 

वृत्तसंस्था/ लंडन

इंग्लंडचा सलामीचा फलंदाज ऍलेस्टर कूक आपल्या शेवटच्या कसोटीतील शेवटच्या डावात शानदार शतक नोंदवत सर्वाधिक धावा जमविणाऱया फलंदाजांता लंकेच्या कुमार संगकाराला मागे टाकून पाचवे स्थान मिळविले तर डावखुऱया फलंदाजांत तो सर्वाधिक धावा जमविणारा फलंदाज बनला आहे. कूकची ही 161 वी कसोटी आहे. इंग्लंडतर्फे सर्वाधिक कसोटी खेळण्याचा व सर्वाधिक धावा जमविण्याचा बहुमान याआधीच मिळविला होता. दुसऱया डावात तो 76 धावांवर पोहोचल्यावर संगकाराला मागे टाकत पाचवे स्थान मिळविले. संगकाराने 134 कसोटीत 291 डावांत 12400 धावा जमविल्या, त्यात 38 शतके व 52 अर्धशतकांचा समावेश होता. कसोटीमध्ये सर्वाधिक धावा जमविणाऱयात सचिन तेंडुलकर 15921 धावांसह पहिल्या, ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग (13378) दुसऱया, द.आफ्रिकेचा जॅक कॅलिस (13289) तिसऱया, भारताचा राहुल द्रविड (13288) चौथ्या स्थानावर आहेत. विशेष म्हणजे या यादीतील पहिले चार फलंदाज उजवे आहेत तर नंतरचा चार फलंदाज डावखुरे आहेत. कूक पाचव्या, संगकारा सहाव्या, विंडीजचा ब्रायन लारा (11953) सातव्या व विंडीजचाच शिवनारायण चंद्रपॉल (11867) आठव्या स्थानावर आहे.

Related posts: