|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » रंकाळा तलावात प्रतिकात्मक जलसमधी आंदोलन

रंकाळा तलावात प्रतिकात्मक जलसमधी आंदोलन 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

 कर्जदाराने पैसे भरले असतानाही थकीत कर्जदार असल्याचे दाखवून अन्याय करणाऱया बँकांविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली होती. पोलीस प्रशासन तसेच संबंधित विभागाने कारवाई केली नाही. संबंधित बँकेतील अधिकाऱयांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत. तसेच कारवाई करण्यास चालढकलपणा करणाऱया पोलीस अधिकाऱयांच्या बदल्या कराव्यात, या मागणीसाठी पुरुष हक्क संरक्षण समितीच्या सदस्यांनी रविवारा रंकाळात तलावात प्रतिकात्मक जलसमधी आंदोलन केले.

पुरुष हक्क संरक्षण समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कर्जाच्या वसूलीच्या नावावर भिती दाखवली जात आहे. पोलीस बंदोबस्तामध्ये बोगस पंचनामा केले जात आहेत. दबाव टाकून कर्जदारांकडून धनादेश घेतले जात आहेत. पार्श्वनाथ बँक माजी मुख्यकार्यकारी अधिकारी, वसंतराव चौगुले पतसंस्थेचे चेअरमन यांनी अशा प्रकारे कर्जदारांच्या मिळकती बेकायदेशीर जप्त केल्याचा आरोपही करण्यात आला. यावेळी पुरुष हक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब कोकितकर यांच्या नेतृत्वाखाली मुस्ताक मुल्ला, रवि माने, तुषार साठे, मोहन पाटील, दिनकर जाधव, गणपत पवार यांनी जलसमधी आंदोलनात सहभाग घेतला.