|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » राष्ट्र व समाज उभारणीत अध्यापकांचे कार्य असाधरण

राष्ट्र व समाज उभारणीत अध्यापकांचे कार्य असाधरण 

प्रतिनिधी/ जयसिंगपूर

हे शतक युवती, महिला व स्त्रीयांचेच राहणार आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रात म्हणजे स्वयंपाकघरापासून कार्पोरेट जगतामध्ये, ज्ञान विज्ञानापासून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, शिक्षणापासून उद्योगक्षेत्रामध्ये इतकेच नव्हे तर लष्करी क्षेत्रापासून अंतरिक्ष क्षेत्रांमध्ये युवतींना त्यांच्या कार्याचा संचार होत आहे. राष्ट्र व समाज उभारणीत अध्यापकांचे कार्य असाधरण आहे. आजच्या महाविद्यालयीन युवतींना सर्व स्तरावर उपलब्ध असलेल्या संधीचा पुरेपूर लाभ उठवावा व या संधीचे सोने करावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांनी केले.

येथील श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालयाच्या तेहत्तीसाव्या वर्धापन दिन व शिक्षक दिन तसेच महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे उद्घाटन प्रसंगी प्राचार्य कुंभार बोलत होते. अध्यक्षस्थानी लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे मॅनेजिंग कॉन्सिलचे अध्यक्ष शांतीनाथ कांते होते.

शांतीनाथ कांते यांनी विद्यार्थी हाच केंद्र बिंदू कसा राहिल, याबाबत संस्थेच्या ध्येय धोरणांचा परियच करून दिला. नवनव्या आवाहनांना तोंड देण्यासाठी महाविद्यालयाचा स्टाफ व विद्यार्थ्यांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. महाविद्यालयाच्या शाळा समितीचे प्रमुख उद्योगपती विनोद घोडावत यांनी लठ्ठे एज्युकेशन सोसायटी व महाविद्यालयाच्या विकासासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता वाटेल ते सर्व देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असा विश्वास दिला.

प्राचार्य डॉ. हरिष भालेराव यांनी महाविद्यालयील विद्यार्थिनींच्या अंगात असणाऱया उपजत गुणांचा व त्या गुणांना प्रोत्साहन देणाऱया महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचा तसेच विद्यार्थिंनीना सर्व सेवा उपलब्ध करून देणाऱया लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या आजी-माजी संचालकांचा कौतुक केले.

स्वागत प्राचार्य डॉ. जी. जे. फगरे यांनी तर प्रास्ताविक प्रा. डॉ. धनंजय कर्णिक यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. ए. बी. आठवले यांनी केले.  डॉ. हरीष भालेराव यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अर्थशास्त्र विभागाच्या भित्तीपत्रकाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. सूत्रसंचालन प्रा. सौ. क्रांती पाटील, प्रा. सौ. अर्पिता चौगुले यांनी केले.  आभार प्रा. एम.के. घुमाई यांनी मानले.

 

Related posts: