|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » आधुनिक काळात निसर्ग संवर्धन महत्वाचे:रणजित शिंदे

आधुनिक काळात निसर्ग संवर्धन महत्वाचे:रणजित शिंदे 

वार्ताहर/ बारामती

बारामती येथील तिरंगा कॉलेज ऑफ अनिमेशेन आणि व्हिजुअल इफेक्टस यांच्या माध्यमातून रविवारी पर्यावरणपुरक शाडू  माती पासून गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. निसर्ग संवर्धन करून पर्यावरणाचा होणारा ऱहास थांबविणे गरजेचे आहे. तसेच पर्यावरणाचे जतन करण्यासाठीची नीतिमूल्ये विद्यार्थीदशेतच मुलांच्या मनावर रूजवणे गरजेचे आहे,  यासाठी प्रयत्नशिल राहणे महत्वाचे आहे, असे मत तिरंगा कॉलेज ऑफ अनिमेशेन आणि व्हिजुअल इफेक्टस चे चेअरमन राणजित शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांची कल्पकता व निसर्गाविषयी आसणारी आस्था या कार्यशाळे दरम्यान दिसून आली.पर्यावरणपुरक शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार केल्यानंतर निसर्गाचे होणारे नुकसान आपण किती प्रमाणात रोखू शकतो, हे कार्यशाळे दरम्यान प्रशिक्षक भारत काळे यांनी विद्यार्थ्यांना समजावून दिले. तसेच पर्यावरणपूरक सुबक गणेश मूर्ती कशी बनवली जाते याचे प्रात्यशिक महेंद्र दीक्षित यांनी दाखवले. यासाठी बारामती येथील क्रियेटीव माइंडसचे संचालक डो. पोपटराव मोहिते यांनी उपस्थिती दर्शवली, गजानन भीवराव देशपांडे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री चव्हाण यांचे सहकार्य लाभले. ही कार्यशाळा गजानन भिवराव देशपांडे विद्यालयाच्या मैदानावर अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडली.

Related posts: