|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » मखरांच्या विविध कलाकृती बाजारात उपलब्ध

मखरांच्या विविध कलाकृती बाजारात उपलब्ध 

साताऱयात तीन ठिकाणी मखर विक्रीचे प्रदर्शन,  पर्यारवण पुरक पुठय़ांच्या मखरला मोठी मागणी

प्रतिनिधी/ सातारा

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ, निर्विघनम कुरु देवो, अशी महती असणाऱया गणरायाच्या गणेशोत्सव म्हटले की, आरास ही आलीच. पूर्वीसारखी गणेशोत्सव सजावटीसाठी साहित्य हे घरगुती असायचे, किंवा सुतारमंडळीकडून तयार करून घेतले जात असे. मात्र अलीकडच्या काही वर्षात रेडिमेड मखर बाजारात मिळू लागली आहे.

सातारा शहरात ही मखर विक्रीची प्रदर्शनं भरली आहेत. या प्रदर्शनात तब्बल एक हजार रुपयांपासून ते चाळीस हजार रुपयांची मखर विक्रीला आहेत. विशेष म्हणजे या वर्षी सरकारने थर्माकोल बंदी आणल्याचा फटका या व्यवसायावर बसला असला तरीही व्यावसायिक मंडळींनी त्यातूनही एक पाऊल पुढे टाकत पर्यावरण पूरक अशी मखर गणेश भक्तासाठी आणली आहे. त्या मखरला जोराची मागणी होत आहे.

गणपती बाप्पा हे विघ्नहर्त्याच, सुखकर्ताच रूप. बाप्पाच्या आगमनाची सर्वांनाच ओढ असते. घरातील प्रत्येकजण त्यांच्या आगमनाची तयारी करत असतो.  छानपैकी मखर बाजारात मिळते. त्यामध्ये ही काही गणेश भक्त आपल्या बाप्पाचे प्रतिष्ठापना करत असतात. सातारा शहरात घरगुती गणपती बसवताना एक वेगळा हुरूप पहायला मिळतो. गणेशभक्त्यांच्या सोयीसाठी कलाकार मंडळींनी मखर तयार करून बाजारात विक्रीला आणल्या आहेत. त्या मखर पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी अक्षरशः झुंबड उडते आहे.

बाजारात विविध दहा प्रकाराच्या मखरीचा समावेश

सातारा शहरात मखर तयार करणारे अनेक कलाकार आहेत. या कलाकारांनी स्वतः त्याच्या कारखान्यात मखर तयार केल्या आहेत. त्यामध्ये महत्वाच्या दहा प्रकारच्या मखर आहेत. त्यामध्ये राजमहाल मखर, नंदी मखर, सुवर्ण मंदीर मखर, नटराज मंदीर मखर, श्रीराम मंदीर मखर यासह अगदी संगम माहुलीच्या काशी विश्वेश्वर मंदिराची मखर तयार केली असून मागणीनुसार पुरवठा केला जातो आहे. त्यामुळे शहरातील विविध ठिकाणी ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होत आहेत.