|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » चुकीच्या निर्णयाला जिल्हाधिकाऱयांचा ठोसा

चुकीच्या निर्णयाला जिल्हाधिकाऱयांचा ठोसा 

वादग्रस्त बाऊटवरुन जिल्हाधिकाऱयांनी काढली पंचाची खरडपट्टी

प्रतिनिधी/ सातारा

सातारा जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या शालेय बॉक्सिंगच्या स्पर्धेत पंचांकडून चुकीचा निर्णय दिल्याने पालक आक्रमक झाले. अन् त्या स्पर्धेला विरोध दर्शवला होता. त्याबाबत ‘तरुण भारत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारावकर यांनी शिवाजी उदय मंडळाचे कार्यकर्ते जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांची बैठक घेतली. त्या बैठकीत संबंधित पंचाची चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले. दरम्यान, वादग्रस्त बाऊट परजिह्यातील पंचासमोर घेण्यात यावी. व उरलेल्या सर्व बाऊट घेण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. दरम्यान, पालकांनी व शिवाजी उदय मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ‘तरुण भारत’चे अभिनंदन केले.

शाहु क्रीडा संकुलात शालेय बॉक्सिंग स्पर्धेला जोरदार रंगत आली असताना एका बॉऊटमध्ये दमदार फाईट सुरु झाली. अगदी रेड आणि ब्ल्यू अशा दोघांमध्ये चांगली लढत होत असताना रेडच्या बाजूने चुकीचा निर्णय दिल्यावरुन स्पर्धेवेळी गेंधळ झाला. पंचावर आक्षेप घेत पालकांनी स्पर्धा थांबवली. याबाबत ‘तरुण भारत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने दखल घेतली. निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारावकर यांनी सकाळी जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांच्यासमवेत बैठक घेतली होती. त्यावेळी या प्रकरणावर चर्चा होवून दुपारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी बारावकर यांच्या उपस्थितीत शिवाजी उदय मंडळाचे संग्रामजित उथळे, रमेश शिंगटे, देवेंद्र बारटक्के, सचिन दीक्षित, शैलेश देशिंगकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी घडलेल्या घटनेचा प्रकार कथन केला. दरम्यान, त्याबाबत व्हिडीओही बाऊटचा दाखवला. तो खेळ पाहून निवासी उपजिल्हाधिकारी बारावकर हेही अचंबित झाले. . रेडवाला खेळाडू चांगला खेळतो आहे. . पंच कोण आहे?, कसा निर्णय . देतो. ही बाऊट परत घ्या, असा आदेश दिला. तसेच पुन्हा राहिलेल्या 18 बाऊट परजिह्यातील पंच घेवून खेळवा, अशा सूचना दिल्या. या दिलेल्या निर्णयानुसार तसेच जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनीही संबंधिता बाऊट व तसेच पंच . बाबत तांत्रिक कमिटीपुढे बाबी तपासून निर्णय घेवून ती बाऊट घेतली जाईल, चुकीच्या बाबीवर . कारवाई केली जाईल, असे संबंधित पालकांना . सांगिलते. दरम्यान, न्याय मिळाल्याच्या भावनेने व खेळाडूंना चांगली वागणूक मिळाल्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयातून आनंदाने शिवाजी उदय मंडळाचे कार्यकर्ते बाहेर पडले.

तरुण भारतमुळे न्याय मिळाला

खऱया खेळाडूच्या खेळाला न्याय मिळाला पाहिजे. सातारा जिह्यातील खेळाडू चमकला पाहिजे. याच भ्
भावनेने शिवाजी उदय मंडळ आजपर्यंत कार्य करत आहे. शिवाजी उदय मडळाने अनेक खेळाडू घडवले आहेत. तरुण भारतचेही कौतुक करावे तेवढे थोडेस आहे, असे पालकांनी सांगितले.