|Monday, November 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गणेश चतुर्थीची वाटचाल ‘इको प्रेंडली’’कडे!

गणेश चतुर्थीची वाटचाल ‘इको प्रेंडली’’कडे! 

प्रतिनिधी/ पणजी

यंदाची गणेशचतुर्थी ‘इको प्रेंडली’ पर्यावरण पुरक होण्याकडे जनतेचा मोठय़ा प्रमाणात कल दिसून येत आहे. वाढत्या कर्करोग व इतर व्याधींमुळे थर्मोकोल, प्लास्टिकपासून बनविलेल्या वस्तूंच्या खरेदीवर विपरित परिणाम झाला असून ‘फटाक्यांशिवाय चतुर्थी’ हा एक नवा पायंडा गोव्यातील जनतेत रुजू लागलेला आहे.

वाढता कर्करोग व तत्सम रोगांपासून जनतेने बऱयापैकी धास्ती घेतलेली असून आरोग्याविषयी होत असलेल्या जनजागृतीचा परिणाम म्हणून राज्यातील सर्वच नगरसेवक व नगराध्यक्षांनी थर्मोकोल व प्लास्टिक विरुद्ध दंड थोपटले आहेत. अनेक नगराध्यक्षांनी थर्मोकोलचा कचरा उचलणार नाही, असा इशारा दिल्यानंतर बहुतांश मात्रात थर्मोकोलपासून मखरे बनविण्याचे प्रकार आता कमी झाले आहेत. राज्यातील अनेक गणेशोत्सव मंडळांनी देखील थर्मोकोल व प्लास्टिक वस्तूंना फाटा देण्याचा निर्णय घेतला आहे.

घराघरांमध्ये होतेय मोठी जागृताr

थर्मोकोल व प्लास्टिकसारख्या वस्तूंचा वापर करुन उर्वरित कचरा जाळल्याने कर्करोग व तत्सम रोंगाना निमंत्रण मिळते. यामुळे घरांघरांममध्ये झालेल्या जनजागृतीचा परिणाम म्हणून घरांतील प्रमुखांनी थर्मोकोलपासून बनणाऱया मखरांना आवर घालण्याचा निर्णय घेतला आहे.

फटाक्यांचे प्रदूषण टाळण्याचा प्रयत्न

फटाक्यांपासून तसेच दारुकामाच्या आतषबाजीमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी अनेक घरांमध्ये गेल्यावर्षी बऱयापैंकी जनजागृती झाली. गतवर्षी 20 टक्के पेक्षा जास्त घरांतून फटाके व दारुसामान गायब झाले होते. यावर्षी त्यात वाढ झाली असून 30 ते 35 टक्के घरांमध्ये यंदापासून गणेशचतुर्थी फटाके व दारुसामान मुक्त साजरी होणार आहे. बाजारात दारुसामानाच्या विक्रीवरही आता त्याचा परिणाम होत आहे.

फटाक्यांचा जनावरांवरही होतो परिणाम

कुत्रे, मांजरे, गायी, बैल व तत्सम प्राण्यांवरही फटाके व दारुकामाच्या आतषबाजीने अत्यंत गंभीर परिणाम होत असल्याचे आढळून आले आहे. अनेक भागात फटाक्यांच्या आवाजाने कुत्री थरथर कापत असतात. प्राणिमात्रांवर कानठळ्या बसणाऱया फटाके सदृष्य बाँबच्या आवाजाचा अत्यंत विपरित परिणाम होत असून फटाक्यांपासून मुक्ती मिळविण्यासाठी अनेक घरात यावर्षीपासून मोठय़ा प्रमाणात प्रयत्न सुरु झाले आहेत. जनतेमध्ये झालेल्या जागृतीचा परिणाम म्हणून राज्यात यावर्षी पर्यावरण पुरक गणेश चतुर्थीच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे.

Related posts: