|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » हंगामातील पहिल्या पर्यटन जहाजाची गोव्याला सलामी

हंगामातील पहिल्या पर्यटन जहाजाची गोव्याला सलामी 

‘एमव्ही वायकिंग’मधून 884 पर्यटन मुरगांव बंदरात दाखल

प्रतिनिधी/ वास्को

मुरगाव बंदरात काल सोमवारी सकाळी यंदाच्या पर्यटन हंगामातील पहिल्या जहाजाचे आगमन झाले. ‘एमव्ही वायकिंग ओरियन’ हे पर्यटन जहाज मस्कतहून मुंबईमार्गे गोव्यात दाखल झाले असून 884 विदेशी पर्यटकांनी गोव्याच्या पर्यटनाच्या हेतूने गोव्यात पाऊल ठेवले. या जहाजाच्या आगमनाने गोव्याच्या पर्यटन हंगामाला सलामी मिळालेली आहे.

या पर्यटक जहाजात 884 पर्यटकांसह 470 कर्मचारी आहेत. मार्च-एप्रिलपर्यंत एका मागोमाग पर्यटक जहाजे गोव्यात दाखल होणार आहेत. या हंगामात 39 पर्यटक जहाजे मुरगांव बंदरात दाखल होण्याची अपेक्षा आहे. काल सोमवारी ‘एमव्ही वायकिंग ओरियन’ या पर्यटक जहाजातून आलेल्या पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी एमपीटीचे उपाध्यक्ष जी. पी. राय, एमपीटीचे विभाग प्रमुख, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे उपकमांडर आदी उपस्थित होते. एमपीटीचे उपाध्यक्ष जी. पी. राय यांनी पर्यटक जाहाजातील मास्टर, अधिकारी व खलाशांचे स्वागत केले.