|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » प्रेयसीचा जाळून खून, प्रियकराला अटक

प्रेयसीचा जाळून खून, प्रियकराला अटक 

संशयितास घटप्रभा रेल्वे स्थानकावर अटक : मृत युवती व आरोपी तामिळनाडू येथील

वार्ताहर/ घटप्रभा

प्रेम प्रकरणातून पेयसीला फसवून तिचा खून व नंतर जाळून पुरावा नष्ट केल्याची घटना 29 जून रोजी घडली होती. याप्रकरणी आरोपीला सोमवारी सकाळी घटप्रभा रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली आहे. ही घटना तामिळनाडू येथे घडली असून आरोपीला संशयावरून घटप्रभा रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतले असता ही घटना उघडकीस आली. शिवा (वय 30, रा. करूंगळ, ता. अटय़ाळ, जि. रामलिंगपूर, तामिळनाडू) असे आरोपीचे नाव आहे. तर व्ही. मालती (वय 20) असे मृत युवतीचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी, तामिळनाडू येथील शिवा हा विवाहित असून त्याला दोन मुलेही आहेत. मात्र त्याचे शेजारील गावातील एका मालती नावाच्या वीस वर्षीय युवतीशी प्रेमसंबंध होते. आपण अविवाहित असल्याचे खोटे सांगून तिला आपल्या जाळय़ात ओढले होते. दरम्यान त्याने मालतीशी लैंगिक संबंध ठेवून लग्नाचे आमिष दाखविले होते.

बरेच दिवस झाले तरी शिवा आपल्याशी लग्न करण्याचे टाळत असल्याचे मालतीला समजले. यामुळे तिने लग्नासाठी तगादा लागला होता. परंतु शिवाने तिला लग्नासाठी नकार दिला. याच रागातून त्याने मालतीशी गोड बोलून निर्जनस्थळी नेऊन तिचा खून केला. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह जाळून टाकला. यानंतर 13 जुलै रोजी शिवानेच तिचा खून करून मृतदेह जाळल्याचे तपासात उघड झाले होते. तेंव्हापासून शिवा फरारी होता.

खून केल्यानंतर शिवा आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, मुंबई फिरून मिरजमार्गे हुबळीला जात होता. दरम्यान घटप्रभा रेल्वे स्थानकावर आल्यानंतर तेथे आरपीएफ पोलीस असल्यामुळे त्याने धावत्या रेल्वेतून उडी टाकली. अचानक रेल्वेतून उडी टाकल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखरे पोलिसी खाक्या दाखविताच त्याने खुनाची कबुली देऊन त्याबद्दल माहिती दिली.

Related posts: