|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » गणेशोत्सवाच्या निमित्ताने खास माझा बाप्पा ऍप

गणेशोत्सवाच्या निमित्ताने खास माझा बाप्पा ऍप 

बेळगावच्या अभियंत्याने साकारला अभिनव उपक्रम

प्रतिनिधी/ बेळगाव

प्रत्येक गणेश भक्ताला बेळगावच्या गणेशाचे दर्शन घरबसल्या उपलब्ध करुन देणारे एक ऍप तयार झाले आहे. बेळगावच्याच एका सॉप्टवेअर इंजीनिअरने हे ऍप बनविले असून गणेश भक्तांसाठी ते एक पर्वणी ठरणार आहे. हे ऍप बेळगावकरांच्या सेवेसाठी दाखल होत आहे. येथील भव्यदिव्य गणेशोत्सवाच्या परंपरेपासून प्रेरणा घेऊन हा उपक्रम साकारण्यात आला आहे.

श्रेयस श्रीकांत पाटील असे त्या तरुणाचे नाव आहे. बेंगळूर येथील एका सॉप्टवेअर कंपनीमध्ये तो काम करतो. आपली नोकरी सांभाळत त्याने हे ऍप बनविले असून गणेश भक्तांना शोधाशोध करावी लागू नये अशा दृष्टिने या ऍपची रचना करण्यात आली आहे. बेळगावात गणेशोत्सव पाहण्यासाठी दरवषी लाखो भाविक येतात. कोणत्या मंडळाने कोणता देखावा केला किंवा कुठल्या मंडळाची मूर्ती चांगली आहे? हे पाहण्याची माहिती मिळत नसते. यामुळे त्यांना शोधाशोध करावी लागते. मात्र हे ऍप वापरणाऱयांना अशी कोणतीही शोधाशोध करावी लागणार नसून गणेश दर्शन अतिशय सोपे होणार आहे.

सध्या सोशल मीडीयाचा वापर मोठय़ा प्रमाणात होतो आहे. यामुळे गणपतीच्या उत्सवासाठी स्वतंत्रपणे या ऍपचा वापर होणार आहे. अव्यवसायिक प्रकारचे एक ऍप एखाद्या सणासाठी वापरले जाणे हा आपल्या देशामधील पहिलाच प्रयोग बेळगावमध्ये केला जाणार असून बेळगावकरांच्या दृष्टिने ही अभिमानाची बाब ठरणार आहे. माझा बाप्पा या ऍपमध्ये सर्व गणेश मंडळे आपापल्या गणपतींचे फोटो व इतर कार्यक्रमांचे फोटोही घालू शकतात. प्रत्येक घरातील गणपतीचे देखावे व मूर्तीचे फोटो अपलोड करता येतात. यामुळे संपूर्ण देशभरातील नागरिकांना व नातेवाईकांना बेळगावमधील गणेश देखाव्यांचे दर्शन घडू शकणार आहे.

यासाठी वैयक्तिक आणि सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱया प्रत्येकाने प्लेस्टोअरवर जाऊन माझा बाप्पा हे ऍप डाऊनलोड करणे गरजेचे आहे. वैयक्तिक माहिती भरल्यानंतर हे ऍप वापरता येणार आहे. या ऍपवर सर्वाधिक पसंतीस उतरलेल्या फोटोंना बक्षीसेही दिली जाणार आहेत. गुगल मॅपच्या माध्यमातून गणेश दर्शनासाठी फिरत असताना या ऍपवर आपल्या आसपास किती गणपती आहेत, याची माहिती मिळू शकणार आहे. यामुळे हे ऍप यंदाच्या गणेशोत्सवात आकर्षण ठरणार आहे.

बसच्या अनियमीततेमुळे नागरिकांचे हाल

दुपारनंतर बससेवा सुरळीत

10 डीआय 39 बसच नसल्याने सकाळच्या सत्रात प्रवाशांना ताटकळत थांबावे लागले.

10 डीआय 40 दुपारी 3 पर्यंत बस अशा थांबून होत्या.

@ प्रतिनिधी

बेळगाव

इंधनदरवाढी विरोधातील बंदच्या पार्श्वभूमिवर वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसच्या अनियमीत कारभारामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. कौन्सिलिंग व इतर कारणांसाठी दाखल होणारे विद्यार्थी व नोकरदारांची गैरसोय झाली होती. दुपारनंतर मात्र बससेवा सुरळीतपणे सुरु करण्यात आली.

बंदमुळे बससेवा सुरु की बंद या संदर्भात वायव्य परिवहनने स्पष्ट भूमिका घेतली नव्हती. मात्र सोमवारी सकाळी अचानक बससेवा खंडीत ठेवण्यात आली. बाहेरील मार्गावरील बससेवा सुरु होत्या. मात्र शहर आणि उपनगरी भागात सेवा देणाऱया बस सकाळच्या सत्रात पूर्णपणे बंद राहिल्यामुळे प्रवाशांना बस स्थानकांमध्ये ताटकळत थांबण्याची वेळ आली होती.

दुपारी 3 नंतर सर्वबससेवा सुरळीतपणे सुरु करण्यात आल्या. उपलब्ध प्रवाशांना इकडून तिकडे जाण्यासाठी या सेवेचा उपयोग झाला. परिवहनने अधिकृत घोषणा न करता अचानक बसबंद केल्यामुळे अनेकांची गैरसोय होत होती. प्रवास अनिवार्य असल्याने काहींनी रिक्षा सेवांचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला. मात्र बस नसल्याने काही रिक्षा चालकांनी मनाला येईल तसा दर आकारण्यास सुरुवात केली होती. तर बहुतांश रिक्षा चालकही बंदमुळे सकाळच्या सत्रात प्रवाशांना सेवा देत नव्हते.

या प्रकाराने विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले. शाळा आणि महाविद्यालये बंद असले तरी विविध परीक्षांचे कौन्सिलिंग, कागदपत्रांच्या फेरतपासण्या व इतर कामांसाठी विद्यार्थ्यांना बोलाविण्यात आले होते. अशा विद्यार्थ्यांनी स्वतःच्या वाहनाची सोय नसल्यास विविध अडचणींचा सामना करावा लागला.

Related posts: