|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » देशव्यापी बंद चिकोडीत फोल

देशव्यापी बंद चिकोडीत फोल 

वार्ताहर/ मजगाव

येथील तानाजी गल्लीतील रहिवासी उद्योजक व म. ए. समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते तिप्पाण्णा शाबाण्णा सातेरी (वय 67) यांचा अनगोळ येथील तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना अनगोळ येथे उघडकीस आली.

तिप्पाण्णा सातेरी हे गेले काही दिवस मानसिक अस्वस्थ होते. शनिवारी दुपारी जेवण करून ते दुचाकीवरून उद्यमबाग येथील कारखान्यात जाऊन येतो, असे सांगून गेले होते. पण त्या दिवसापासून ते घरी परतलेच नाहीत. कुटुंबीयांनी सर्वत्र यांचा शोध घेतला. पण त्याला यश आले नाही. रविवारी यांची दुचाकी पिरनवाडी नाक्याजवळ पार्क केलेली आढळली. रविवारी सायंकाळी अनगोळ येथील सोमनगिरी तलावात अज्ञात मृतदेह तरंगत असल्याची चर्चा अनगोळ परिसरात सुरू होती. ही माहिती दूरध्वनीवरून एकाने ही माहिती टिळकवाडी पोलिसांना कळविली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पण अंधार असल्यामुळे उद्या सकाळी याचा शोध घेतला जाईल, असे सांगून ते निघून आले. सोमवारी सकाळी ही माहिती सातेरी यांच्या घरात समजताच त्यांनी तलाव परिसराकडे धाव घेतली. व मृतदेहाची ओळख पटविली. त्यानंतर सिव्हील हॉस्पिटलमध्ये मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्यावर मजगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उद्यमबाग येथील उद्योजक उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, भाऊ, दोन विवाहित मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार दि. 13 रोजी होणार आहे.

तिप्पाण्णा हे पदवीधर असून उद्यमबाग येथे त्यांचा लेथ मशिन कारखाना आहे. सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रेसर असायचे.

Related posts: