|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » तालुक्मयात गणेशोत्सवाची जोरदार तयारी

तालुक्मयात गणेशोत्सवाची जोरदार तयारी 

हिंडलगा /वार्ताहर

अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या गणेश चतुर्थीसाठी संपूर्ण तालुका सज्ज झाला आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही गणशोत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा केला जातो. गणेशोत्सवाची सर्वत्र तयारी सुरू असून ती अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱयांची मंडप सजावट, विद्युत रोषणाई  व इतर तयारीसाठी एकच धांदल उडाली आहे तर घरगुती गणेशमूर्तीच्या प्रति÷ापनेसाठीही गणेशभक्तांची सजावटीसह इतर कामे सुरू आहेत. त्यामुळे सगळीकडे उत्साहाने वातावरण निर्माण झाले आहे.

बेळगावसह संपूर्ण तालुक्मयात प्रत्येक गावामध्ये गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. यासाठी घरोघरी गणपतीसह प्रत्येक गल्लीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे श्रीमूर्ती प्रति÷ापित केली जाते. दरवषी परंपरेनुसार कोणताही खंड न पडता सर्व मंडळांतर्फे हे कार्य नियमित सुरू आहे. लाडक्मया बाप्पाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी भगव्या पताका आणि विद्युत रोषणाई करण्यावर कार्यकर्त्यांनी भर दिला आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अहोरात्र जागरण करून मंडप उभारणीचे काम हाती घेतले आहे. कार्यकर्त्यांकडून एकजुटीने हे काम सुरू असते. त्यामुळे तालुक्मयातील गणेशोत्सवाला वेगळेच वैभव प्राप्त झाले आहे.

काही गावामध्ये ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा सुरू आहे तर बहुतांश गावामध्ये प्रत्येक गल्लीत श्रीमूर्तीची प्रति÷ापना केली जाते. याशिवाय सजीव देखाव्याद्वारे समाजात प्रबोधन करण्यावरही सार्वजनिक मंडळांकडून भर दिला जात आहे. त्यामुळे प्रबोधनासह नागरिकांचे मनोरंजनही होत असल्याने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व गणेशभक्त सज्ज झाले आहेत.