|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बाप्पांच्या सजावटीसाठी बाबूंचा वापर

बाप्पांच्या सजावटीसाठी बाबूंचा वापर 

प्रतिनिधी/ बेळगाव

लाडक्मया बाप्पाचे आगमन जोरदार व्हावे आणि बाप्पाची आरास ही तितकीच खास असावी यासाठी भक्तांकडून जोरदार तयारी केली जात आहे. यामुळे गणरायाची अनेक रुपे साकारणाऱया मुर्तीकाराबरोबरच सजावट करणाऱया कारागीराचे देखील कौशल्य या उत्सवाच्या माध्यमातून सामोर येत आहे. बाबूंपासून सूप, बुटय़ा करणाऱया बुरुड कारागीरांनी बांबू आणि गवतापासून झोपडी, घरे, बैलगाडया, होडी, झोका, फुलांच्या कमानी असे विविध साहित्य बनविले असून बाप्पाच्या सजावटीतील आपली  कला इको प्रेंडली स्वरुपात  सादर केली आहे.

 शेतकरी रुपातील गणराया, बैलगाडीतील बाप्पा, पारंपारीक खेळ खेळणारा गणपती, पाण्यात खेळणारा बाप्पा, तसेच विविध बालरुपातील गणेशमुर्ती मुर्तीकारांनी तयार केल्या असून यानुसार प्रसंग सादर करणारे इको प्रेडली सजावटीचे साहित्य बुरुड गल्लीतील कारागीरांनी बनविले आहे. दरवर्षी भक्तांच्या मागणीनुसार विविध साहित्य बनवून देणाऱया कारागीरांनी भकतांचा वाढता कल आणि इको प्रेंडली सजावटीवर असणारा भर विचारात घेऊन बाबूंपासून बनविलेले विविध साहित्य विक्रीसाठी ठेवले आहे. यामुळे मागणी वाढली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

प्लास्टीकचा आणि थर्माकॉलचा वाढत्या वापराबरोबरच  सजावटीत दरवर्षी नवीन टेंड येत आहे. मात्र जुने ते सोने म्हणत गवतापासून तसेच काठयांपासून बाबूंपासून सजावट करणारी मंडळी आजही ती परंपरा जोपासत नावीन्याने आरास करताना दिसत आहेत. यामुळे आपली कला भक्तांसाठी उपयोगी पडावी म्हणून विविध साहित्य तयार करण्यात आले आहे.आकारमानानुसार झोपडी 500 ते1500 पर्यंत घर 300 ते 500 ते , बैलगाडी 300 ते 600 तसेच बोट 500 ते 1500 याशिवाय फुलांची कमान 100 पासून पुढे तसेच मोठया आकारतील नारळ 200 ते 500 अशा स्वरुपात विक्री करण्यात येत असूनभक्तांच्या मागणीनुसार विविध साहित्य तयार केले जात आहे. गणेशोत्सव जवळ येईल तसे कामाला वेग आला असून मागील दोन अडीच महिन्यापासून याची तयारी केली जात आहे.

मोहन कोरडे, विपेते बुरुड गल्ली

दरवर्षी भक्तांच्या मागणीनुसार बाबूंचे साहित्य बनविले जात होते. मात्र यावर्षी हे साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले असल्याने मागणी वाढली आहे. आपली कला जोपासावी आणि त्याला आधुनिक टच मिळावा या उद्देशाने इको प्रेडली असे साहित्य बनविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविला असून याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. प्रामुख्याने सर्व साहित्य फोल्डींग करुन ठेवता येत असल्याने हाताळणी सोयीस्कर होत असल्याचे मोहन कोरडे यांनी सांगितले.

Related posts: