|Friday, November 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणाबाहेर!

जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणाबाहेर! 

प्रतिनिधी/ ओरोस

सत्तेची चार वर्षे पूर्ण करणाऱया शासनाला जनतेला दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला असल्याचा आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने केला आहे. पेट्रोलप्रमाणेच अनेक जीवनावश्यक वस्तूंचे दरही दिवसेंदिवस सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर चालले आहेत. ही दरवाढ शासनाने आटोक्यात आणावी. अन्यथा जनआंदोलन छेडले जाईल, असा इशाराही जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी जिल्हाधिकाऱयांना दिला आहे.

वाहतुकीसाठीच्या दैनंदिन वापरातील अत्यावश्यक असलेल्या पेट्रोल व डिझेल या इंधनाचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. पाच वर्षापूर्वी 400 रुपये किंमतीला मिळणारा घरगुती गॅस सिलिंडर 825 रुपयांवर पोहोचला आहे. सर्व सामान्यांचा आधारवड असलेल्या रेशन दुकानांवरुन जीवनावश्यक वस्तू मिळेनाशा झाल्या आहेत. उपलब्ध झाल्याच तर त्या अल्प प्रमाणात वितरित होत आहेत. गणशोत्सवासारख्या महत्वाच्या सणालाही रेशनिंगवर धान्य मिळत नसल्याने जनतेच्या मनात शासनाविरोधी असंतोष पसरला आहे. त्यातच नेटवर्कची असुविधा व ऑनलाईन नोंदणीचे संकट त्यामुळे सर्वसामान्य जनता पेचात पडली आहे.

महागाईला आवर घालावा अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जि. प. अध्यक्ष रेश्मा सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, नासीर काझी, विलास कुडाळकर व अन्य उपस्थित होते.

  

Related posts: