|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आठवडा बाजारात चोरटय़ांनी महिलांच्या पर्स लांबविल्या

आठवडा बाजारात चोरटय़ांनी महिलांच्या पर्स लांबविल्या 

वार्ताहर/ मालवण

सोमवारच्या आठवडा बाजारात चोरटय़ांनी धुमाकूळ घालत ग्रामीण भागातून गणेशोत्सवासह अन्य साहित्य खरेदीस आलेल्या अनेक महिलांच्या पर्स लांबविल्या. यात सुमारे आठ हजाराहून अधिक रक्कम चोरीस गेल्याची माहिती मिळाली आहे. संबंधित महिलांनी सायंकाळी येथील पोलीस ठाणे गाठत चोरीची माहिती पोलिसांना दिली. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कार्यवाही सुरू होती. दरम्यान, सोमवार आठवडा बाजारात संशयितरित्या फिरणाऱया परराज्यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली. मात्र, त्यांच्याकडे काहीही सापडून आले नसल्याची माहिती मिळाली. 

गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपल्याने आजच्या सोमवारच्या आठवडा बाजारात तालुक्मयाच्या ग्रामीण भागातून मोठय़ा संख्येने ग्रामस्थ खरेदीसाठी दाखल झाले होते. बाजारात होत असलेल्या गर्दीचा फायदा चोरटय़ांनी उठवीत खैदा येथील वैशाली कांबळी यांची पर्स लांबविली. या पर्समध्ये त्यांचे सुमारे साडे तीन हजार रुपये होते. त्यामुळे त्यांनी आपल्या नातेवाईकांसह सायंकाळी पोलीस ठाणे गाठत चोरीची माहिती दिली. पूजा भोजने या महिलेचीही पर्स चोरटय़ांनी लांबविली. यात त्यांचे सुमारे साडे चार हजार तसेच अन्य महत्त्वाची कागदपत्रे होती. त्यांनीही तक्रारीसाठी पोलीस ठाणे गाठले.