मोबाईलवर संभाषण करणारा एस.टी.चालक निलंबित

प्रतिनिधी/ देवगड
देवगड एस. टी. आगारातील चालक संजय विठोबा राऊत हे बस चालविताना मोबाईलवर बोलत असल्याप्रकरणी त्यांच्यावर आगार व्यवस्थापकांनी निलंबनाची कारवाई केली आहे. 5 सप्टेंबर रोजी देवगड-बोरिवली ही बस घेऊन जाणारे चालक राऊत हे नांदगाव ते राजापूर या प्रवासादरम्यान गाडी चलवत असताना मोबाईलवर बोलत होते. याबाबत एका प्रवाशाने त्याचे मोबाईलवर शूटिंग करून प्रसिद्धी माध्यमांकडे देऊन चालकावर कारवाईची मागणी केली होती. दरम्यान, देवगड आगार व्यवस्थापक श्री. चव्हाण यांनी याबाबत खात्यांतर्गत चौकशी करून निलंबनाची कारवाई केली आहे.
Related posts:
Posted in: सिंधुदुर्ग