|Monday, November 19, 2018
You are here: Home » Top News » दलित शब्दाच्या वापरासाटी रिपाईं सुप्रिम कोर्टात जाणार : रामदास आठवले

दलित शब्दाच्या वापरासाटी रिपाईं सुप्रिम कोर्टात जाणार : रामदास आठवले 

ऑनलाईन टीम / मुंबई :

दलित शब्दाच्या वापरास मनाई करणाऱया मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी नाराजी व्यक्त केली आहे. रिपब्लकिन पार्टी ऑफ इंडियाकडून याविरोधत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे आठवलेंनी माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.

अनुसूचित जाती आणि जमाती असे शब्द सरकारी कामकाजात आधीपासूनच वापरले जात आहेत. त्यामुळे दलित शब्दाचा वापर सुरूच ठेवावा असे आम्हाला वाटते. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आपला पक्ष सर्वोच्च न्यायालयात आव्हान देईल, असे आठवले म्हणाले. शासन व प्रसार माध्यमांसह सर्वांना दलित’ शब्दाचा उपयोग करण्यास मनाई करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पंकज मेश्राम यांनी जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानेही दलित शब्द वापरण्यास मनाई केली. दलित हा शब्द असंवैधनिक असून संविधनाचे निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही हा शब्द वापरण्याला विरोध केला होता, असा दावा या याचिकेत करण्यात आला होता. यानंतर न्यायालयानं दलित शब्दाचा वापर न करण्याच्या सूचना दिल्या.

 

Related posts: