|Sunday, March 24, 2019
You are here: Home » Top News » सलग 17व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ

सलग 17व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ 

ऑनलाईन टीम / मुंबई :

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामन्यांमध्ये चिंतेचे वातावरण असताना सलग 17व्या दिवशी इंधर दरवाढ झाली आहे.पेट्रोल 14 तर डिझेल 15 पैशांनी महागले आहे. यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 88.26रूपये प्रतिलिटर झला असून डिझेलचा दर 77.47 रुपये प्रतिलिटर झाला आहे. सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रत्येकी 23 पैशांची वाढ झाली होती. राज्यातील परभणीमध्ये पेट्रोलसाठी सर्वात जास्त पैसे मोजावे लागत असून येथे तर पेट्रोलने नव्वदी ओलांडली आहे.

 

पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने काँग्रेसकडून सोमवारी भारत बंदची हाक देण्यात आली होती. अनेक पक्षांनी काँग्रेसच्या भारत बंदला समर्थन देत आंदोलनात भाग घेतला होता. यावेळी अनेक ठिकाणी तोडफोडीच्या घटना झाल्याचेही समोर आले. दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मात्र पेट्रोल 55 रूपये दराने मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. पेट्रोलियम मंत्रालय इथेनॉल कारखाना सुरू करणार आहे. त्याच्या मदतीने डिझेल 50 रूपये तर पेट्रोल फक्त 55 रूपये मध्ये मिळेल, अशी माहिती गडकरी यांनी दिली. छत्तीसगडमधील दुर्ग येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.

 

Related posts: