|Friday, November 16, 2018
You are here: Home » Top News » युपीएच्या घोटाळे व लांबलेल्या निर्णयामुळे एनपीए वाढला : रघुराम राजन

युपीएच्या घोटाळे व लांबलेल्या निर्णयामुळे एनपीए वाढला : रघुराम राजन 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली:

घोटाळय़ांच्या चौकशीत होणारा विलंब आणि लांबलेल्या निर्णयांमुळे बँकांचे कर्ज अर्थात एनीपीए वाढत गेला, असे वक्तव्या आरबीआयचे माजी गर्व्हनर रघुराम राजन यांनी केले आहे.

भाजपाचे  ज्येष्ठ खासदार मुरली मनोहर जोशी यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने रघुराम राजन यांना पत्र लिहून समितीसमोर उपस्थित राहण्यास सांगितलं होतं. त्यावर संसदीय समितीला एनपीएबाबत पाठवलेल्या उत्तरात रघुराम राजन यांनी यूपीए सरकारला आरोपीच्या पिंजऱयात उभे केले आहे.राजन यांनी वाढत्या बुडीत कर्जाला तत्कालीन यूपीए सरकार जबाबदार असल्याचा दावा केला. सप्टेंबर 2016 पर्यंत तीन वर्षे आरबीआयचे गव्हर्नर राहिलेले राजन सध्या शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये आर्थिक प्रकरणांचे प्राध्यापक आहेत.

 

बँकांनी विविध कारणांसाठी कर्ज घेतले. मग ते वाढत गेले. त्यामुळे पूर्वीचं कर्ज भरण्यासाठी आणखी कर्ज घेतलं. 2006 पूर्वी पायाभूत सुविधांवर पैसे लावणं फायदेशीर होतं. त्याकाळात स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयडीबाय या बँकांनी सढळ हाताने कर्ज दिली. बँकांनी अति आशावादी होणं घातक ठरलं. कर्ज देताना सावधगिरी बाळगली नाही. जेवढय़ा फायद्याची अपेक्षा होती, तो झालाच नाही, असे रघुराम राजन यांनी म्हटले.

 

Related posts: