|Wednesday, November 21, 2018
You are here: Home » Top News » बिहारमध्ये मॉब लिंचिंग, तरूणाच्या हत्येप्रकरणी 150जणांविरोधात गुन्हा

बिहारमध्ये मॉब लिंचिंग, तरूणाच्या हत्येप्रकरणी 150जणांविरोधात गुन्हा 

ऑनलाईन टीम / पाटणा :

बिहारमध्ये पुन्हा एकदा मॉब लिचिंगची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 150 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.सीतामढी जिलह्यातील एक तरूण आजीच्या वर्षश्रद्धासाठी सामना आणायला जात होता. त्यावेळी जमावाने त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये तरूणाचा मृत्यू झला. या घटनेनंतर बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सीतामढीमधील सिगंहरिया गावचा रहिवासी रुपेश झा त्याच्या आजीच्या वर्षश्रद्धाचं सामान आणण्यासाठी निघाला होता. त्यावेळी त्याच्यासोबत एक मित्रदेखील होता. सामान आणायला जात असताना पिक-अपच्या चालकासोबत त्याचा वाद झाला. यानंतर त्याठिकाणी मोठी गर्दी जमली. जमावानं कोणताही विचार न करता रुपेशला मारहाण करण्यास सुरुवात केली. अनेकांनी रुपेशला काठय़ांनी जबर मारहाण केली. रुपेशने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावानं मारहाण सुरूच ठेवली.

 

काही वेळानं स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी रुपेश गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुपेशची प्रकृती गंभीर असल्यानं कुटुंबीयांनी त्याला शहरातील प्रसिद्ध डॉक्टर वरुण कुमार यांच्या क्लिनिकमध्ये नेले. मात्र रुपेशची प्रकृती अतिशय नाजूक असल्याने वरुण कुमार यांनी त्याला पीएमसीएचमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. मात्र रात्री 11 वाजता त्याचा मृत्यू झाला.

 

 

Related posts: