|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » Top News » इंधन दरवाढीनंतर भाज्या महागल्या

इंधन दरवाढीनंतर भाज्या महागल्या 

ऑनलाईन टीम / मुंबई :

इंधन दरवाढीचा परिणाम हळूहळू जीवनावश्यक वस्तूवर होऊ लागला आहे. इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे भाज्याचे भावही वाढले आहे. भाजीपाला 10 ते 15 रूपयांनी महागला आहे. त्यामुळे इंधन दरवाढीमुळे फटका सर्वसमान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे.

शेतकरी वाहनाने आपला माल मार्केट यार्डात विक्रीस आणतात. तर मार्केट यार्डातून मालाची खरेदी करून घेऊन जाणारे किरकोळ व्यापारीही मालाच्या वाहतुकीसाठी वाहनांचा वापर करतात.शेतकरी,किरकोळ व्यापारी या दोघांना वाहन खर्च द्यावा लागते. इंधन दरवाढीमुळे या वाहन खर्चात वाढ झाल्याने भाजीपाल्यांच्या दरातही वाढ झाली आहे.त्यामुळे फळे , भाजीपाला यांचे भाव सुमारे 5 ते 10 टक्क्यांनी वाटले आहेत.