|Monday, December 17, 2018
You are here: Home » Top News » नागराज मंजुळेसह आर्ची-परशाने मनसे चित्रपट सेनेचे सभासत्व स्वीकारले

नागराज मंजुळेसह आर्ची-परशाने मनसे चित्रपट सेनेचे सभासत्व स्वीकारले 

ऑनलाईन टीम / मुंबई :

सैराट सिनेमामुळे घराघरात पोहोचलेल्या दिग्दर्शक नागराज मंजुळे राजकीय पक्षाच्या जवळ गेला आहे. नागराज मंजुळेने राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे सभासदत्व स्वीकारले आहे.

केवळ नागराजनेच नाही तर सैराट सिनेमा गाजवलेला परशा अर्थात आकाश ठोसर आणि आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुही ‘मनचिसे’चे सभासदत्व स्वीकारले आहे. या सर्वांनी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि सरचिटणीस शशांक नागवेकर, उपाध्यक्ष शर्वणी पिल्लई आणि उमा सरदेशमुख यांच्या उपस्थितीत चित्रपट सेनेचे सभासत्व स्वीकारले. नागराजच्या सैराट सिनेमाने केवळ मराठी सिनेमाचे नव्हे तर बॉलिवूडचेही लक्ष वेधून घेतले. अनेक भाषेत या चित्रपटाची निर्मिती झाली. नुकताच करण जोहरचा धडक हा सैराटचा हिंदी रिमेक येऊन गेला. या सिनेमालाही बॉलिवूडकरांनी दाद दिली. इतकंच नाही तर दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या सिनेमात महानायक अमिताभ बच्चन झळकणार आहेत. नागराजचा फँड्री ते बॉलिवूड व्हाया सैराट हा प्रवास थक्क करणारा आहे. त्यामुळे सिनेइंडस्ट्रीमध्ये नागराजची पेझ सध्या पाहायला मिळत असताना, आता नागराजने मनसे चित्रपट सेनेचे सभासदत्व स्वीकारल्याने, राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Related posts: