|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » मराठा आरक्षणाचा अंतिम अहवाल 15 नोव्हेंबरपर्यंत द्या : हायकोर्टाचे आदेश

मराठा आरक्षणाचा अंतिम अहवाल 15 नोव्हेंबरपर्यंत द्या : हायकोर्टाचे आदेश 

ऑनलाईन टीम / मुंबई :

घोटासंदर्भात मागास प्रवर्ग आयोगाचा प्रगती अहवाल हायकोर्टात सादर करण्यात आला. मागास प्रवर्ग आयोग 15 नोव्हेंबरपर्यंत आपला अंतिम अहवाल सादर करणार आहे. मात्र हायकोर्टाने चार आठवडय़ांनी कामकाजाचा पुन्हा प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. मराठा आरक्षणाबाबत विनोद पाटील यांनी हायकोर्टात याचिका दाखल करुन, आयोगाला कालमर्यादा निश्चित करुन देण्याची मागणी केली आहे.

मराठा आरक्षणाबाबत सरकार चालढकल करत असल्याचं म्हणत हायकोर्टाने सरकारला फटकारलं होतं. राज्यभरात दुसऱयांदा मराठा मोर्चाचं वादळ घोंघावले होते. 9 ऑगस्टला निघालेल्या मराठा क्रांती मुक मोर्चात अनेक ठिकाणी तोडफोड झाली होती.मराठा आरक्षणाचा निर्णय नवीन शैक्षणिक वर्ष सुरु व्हायच्या आत घ्यावा जेणेकरून लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात डिसेंबर 2017 मध्ये दाखल करण्यात आली आहे. विनोद पाटील यांच्यावतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे.