|Monday, November 12, 2018
You are here: Home » Top News » तेलंगणात भीषण अपघात, बस दरीत कोसळून 45 मृत्यूमुखी

तेलंगणात भीषण अपघात, बस दरीत कोसळून 45 मृत्यूमुखी 

ऑनलाईन टीम / तेलंगणा 

तेलंगणाच्या जागतिरालमध्ये आज झालेल्या भीषण अपघातात 45 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्य परिवहन मंडळाची बस कोंडागटूट घाटाजवळ दरीत कोसळल्याने हा अपघात झाला. अपघातात अनेक लोक जखमी झाल्याचं कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे. ब्रेकफेल झाल्याने हा अपघात झाला.

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी अपघातावर शोकव्यक्त केला आहे. जखमींना चांगले उपचार देण्याचे आदेश त्यांनी दिला आहे. तर सरकारने अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रू. मदत जाहीर केली आहे.

Related posts: