|Saturday, April 20, 2019
You are here: Home » Top News » राजस्थान, आंध्र प्रदेश नंतर बंगालमध्येही पेट्रोल-डिझेल स्वस्त

राजस्थान, आंध्र प्रदेश नंतर बंगालमध्येही पेट्रोल-डिझेल स्वस्त 

ऑनलाईन टीम / कोलकात्ता :

आधी राजस्थान, नंतर आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक रुपयाची कपात करण्याची घोषणा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे.

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी पेट्रोल-डिझेलवरील वॅट चार टक्क्मयांनी कमी केला, ज्यामुळे दर अडीच रुपये प्रति लिटर एवढे कमी झाले. त्यानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायुडू यांनीही आंध्रवासियांना दिलासा देत पेट्रोल-डिझेल दोन रुपये प्रति लिटरने स्वस्त केले. आता पश्चिम बंगाल सरकारनेही आपल्या नागरिकांना दिलासा दिला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्हे आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सर्वाधिक महाग पेट्रोल मिळत आहे. त्यामुळे राज्य सरकार नागरिकांना दिलासा कधी देणार याकडे लक्ष लागले आहे. पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र सरकारकडून एक्साईज डय़ुटी, तर राज्य सरकारकडून वॅट वसूल केला जातो. वॅट कमी करुन नागरिकांना दिलासा देणे राज्य सरकारच्या हातात असते, तर एक्साईज डय़ुटी कमी करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. पेट्रोल-डिझेलची दरवाढ आजही सुरुच आहे. आज पेट्रोल 14 पैसे आणि डिझेल 15 पैशांनी महागले. मुंबईत पेट्रोलचा दर 88 रुपये 26 पैसे तर डिझेल 77 रुपये 47 पैसे प्रति लिटर आहे. दररोज वाढणाऱया पेट्रोलची वेगाने शंभरीकडे कूच सुरु आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा संतापाचा पाराही त्याच वेगाने चढत आहे. गेल्या 11 दिवसात पेट्रोल तब्बल 2 रुपये 17 पैशांनी महागले आहे.

 

Related posts: